Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

3 महिन्याचे वीजबिल माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रहारचे

Responsive Ad Here
अमरावती प्रतिनिधी  राजू कलाने

  महावितरण अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा याच्यावर महावितरण अधिकारी तोडगा काढत नाही आहे म्हणून आता उग्र आंदोलन करण्यास महावितरण अधिकारी भाग पाडत आहे.  तीन महिन्याचे वीज बिल माफ करा अन्यथा 13 जुलै सोमवारी अमरावती महावितरण अधीक्षक अभियंता यांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करणार आणि याची सर्वस्व जबाबदारी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची राहील असा इशारा प्रहार’चे रोशन देशमुख यांनी दिला आहे.कोरोना विषाणूच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे सामान्य माणसाला रोजगारसुद्धा बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. यामुळे सरकारने विज माफीची घोषणासुद्धा केली होती. तीन महिन्यानतर सामान्य माणसाला विज बिल शुल्क जास्त आल्यामुळे त्याच्या उत्पन्नापेक्षा हे विज बिल जास्त प्रमाणात आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सामान्य माणसाजवळ

पैसा नाही, जेवणाची व्यवस्था नाही तर हे लोक वीज बिल कसे भरणार. हे वीज बिल माफ करण्याची मागणीसुद्धा प्रहार जनशक्तीच्या वतीने करण्यात आली होती. हे विजबिल अवाढ्य असल्यामुळे कोणत्या पद्धतीची आहे, त्याचा पाठपुरावा आणि चौकशी करावी आणि बिल धारकास बिल भरण्यास थांबवावे अशी मागणी केली होती. कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षच्या कार्यकर्ता रोशन देशमुख यांच्या वतीने महावितरण कार्यलयावर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ता रोशन देशमुख यांचा वतीने देण्यात आली होती. परंतु वीजबिल माफ झाले नाही.अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय अमरावती यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा याच्यावर महावितरण अधिकारी तोडगा काढत नाही आहे म्हणून आता उग्र आंदोलन करण्यास महावितरण अधिकारी भाग पाडत आहे. तसेच  तीन महिन्याचे वीज बिल माफ करा अन्यथा 13 जुलै सोमवारी अमरावती महावितरण अधीक्षक अभियंता यांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करणार आणि याची सर्वस्व जबाबदारी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची राहील असा इशारा प्रहार’चे रोशन देशमुख यांनी दिला आहे.