नयन खरात मेहकर प्रतिनिधी
मेहकर सुकळी येथे ,स्व धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या जयंन्ती निमित्त त्यांचे सुपुत्र प्रा.अाशिष दिलीपराव रहाटे यांनी तालुक्यातील ठिकठिकानच्या गावामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध मोफत वाटण्याचा संकल्प केला आहे आयुष मंत्रालय भारत सरकारने मान्यता दिलेले अर्सिनिक अल्बम ३० या होमीओपँथिक औषधीचे वाटप करण्याचा त्यांचा संकल्प असुन गोवोगावी ते त्याचा वाटप करत आहेत सुकळी येथे भेट देऊन त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय सुकळी येथे सर्व कुटुबांना पुरेल ईतकी औषधी
दिली यावेळी आशिष रहाटे जिल्हा परिषद गटनेते शिवसेना, सरपंचपती नितीन नवले,पत्रकार फिरोज शहा ,ग्रामपंचायत सदस्य आशासेविका व इतर लोक होते व औषधीचे सेवन कसे करायचे याबाबत डॉ सुजित महाजन,डॉ प्रिती महाजन,डॉ समिर देशमुख हे मार्गदर्शन करत आहेत कोरोणाच्या पाश्वभुमिवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे औषध उपयोगी आहे याचे कुठलेही दुष्परिणाम नाही व औषधीचा संपुर्ण डोस घेतल्यावर साधारनता हे तिस दिवस प्रभावी रहाते अशी माहीती यावेळी देण्यात आली
