Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव जिल्ह्यातील अवैधरित्या वसुलीसाठी येणाऱ्या भारत फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर व वाहनांवर कारवाई करा - रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर

Responsive Ad Here

शिवदास सोनोने

रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर
रिझर्व बँकेच्या आदेशानंतरही सक्तीची वसुली भारत फायनान्स कंपनीने बंद केले नसून वसुली करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मलकापूर येथे वाहनाद्वारे अवैधरित्या येऊन वसुली करणाऱ्या भारत फायनान्स च्या अधिकार्‍यांवर व त्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यात मलकापूर अग्रस्थानी आहे यातच भर म्हणून जळगाव जिल्ह्यातील रेड झोन मध्ये असलेली भारत फायनान्स कंपनी चे कर्मचारी योगेश अनिल पाटील व मॅनेजर आकाश कदम हे वसुलीसाठी जळगाव जिल्ह्या जो रेड झोन मध्ये आहे तेथून मलकापूर येथे आपल्या वाहनाद्वारे वसुलीसाठी येत असतात दररोज वाहनांद्वारे वसुलीसाठी येत असतानाही या जिल्ह्यातून त्या जिल्ह्याकडे वाहन नेण्याची कोणतीही परवानगी नसताना  रिझर्व बँकेने 31 ऑगस्टपर्यंत वसुली करू नये  असे आदेश दिले असताना  लोकांचा जमा करू नये असे आदेश असताना  बेकायदेशीररित्या  जिल्ह्यात प्रवेश करून  आपल्या वाहनाद्वारे येतात   व शहरात  कोरोना अफ्फेक्टेड असलेला भाग काळीपुरा, मंगलगेट, पारापेट  या भागात महिलांना जमा करून वसुली करतात   महिलांना फोनद्वारे  तुम्हाला पैसे भरावे लागतील आमच्याकडे वसुलीचे आदेश आहेत अशा प्रकारच्या धमक्या देत असतात. आधीच जळगाव जिल्हा हा रेड झोन मध्ये असून त्या जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात भारत कारखान्याचे कर्मचारी येत असल्याने कोणाचा संसर्ग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच मलकापूर येथील कोरोना ग्रस्त भागातून इतर भागात ये जा करत असल्याने मलकापूरला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे
 भारत फायनान्स मुक्ताईनगर जिल्हा जळगाव सदर कर्मचारी  योगेश अनिल पाटील व व्यवस्थापक आकाश कदम यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करून त्यांच्याकडे कोणत्या परवानगी आहे याची चौकशी करून त्यांच्या वाहनांवर पण कारवाई करावी तसेच जिल्ह्याच्या व तालुक्याच्या सीमा सील असताना अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करणे बाबत सुद्धा कारवाई करण्यात यावी व त्यांना मलकापूर शहरांमध्ये बचत गटाचा महिलांना यांच्या मीटिंग करण्यापासून परावृत्त करावे करिता योग्य कार्यवाहीसाठी सादर भारत फायनान्स कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर जिल्हाध्यक्ष रासप प्रकाश ताटे जिल्हा संघटक करण सिंग जिल्हा युवा अध्यक्ष संतोष वानखेडे शहराध्यक्ष शिवदास सोनोने जील्हा उपाध्यक्ष सय्यद ताहेर इतर कार्यकर्ते उपस्थित होते