प्रतिनिधी@जितेश कारीया
30 जुलै
हिवरखेड :- येथील शेतकऱ्यांच्या मुलीने तेल्हारा तालुक्यात एस. एस.सी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
स्व. राजीव गांधी विदयालय तळेगाव येथे शिकत असलेली कू रेणुका संतोष डांगे या शेतकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत 98.60% मार्क मिळवून तेल्हारा तालुक्यातुन प्रथम तर अकोला जिल्ह्यातून पाचवा क्रमांक पटकाविला आहे. रेणुका चे वडील संतोष डांगे हे शेतीकाम करीत असून मुलीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून आमचे व गावाचे नावलौकिक केले असल्याचे त्यांनी सांगितले रेणुका संतोष डांगे ही आपल्या या यशाचे श्रेय तिचे गुरुजन, आई, वडील व शिक्षकवृंद यांना देते.

