Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती मधील जुन्या मार्केटची इमारत कोसळली

Responsive Ad Here

मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अमरावती शहरातील एक जुने मार्केट कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मार्केटची इमारत रात्रीच्या वेळेस कोसळल्याने या परिसरात चौकीदाराव्यतिरीक्त कोणीही नव्हते. जखमी झालेल्या चौकीदाराला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास अमरावती शहरातील गांधी मार्केटचा हा अर्धा भाग कोसळला. हे मार्केट सुमारे ६५ वर्षे जुने आहे. अमरावतीमधील जयस्तंभ चौक परिसरात हे मार्केट आहे. मार्केटचा जो भाग कोसळला यात पंधरा ते वीस मोठमोठी दुकाने आहेत. या दुकानामध्ये असलेला लाखो रूपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी आणि मदत पथक पोहोचले आहे. मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दिवसा ही दुर्घटना घडली असती तर मार्केटमधील अनेकांचे जीव गेले असते. मात्र दैव बलवत्तर म्हणून घटना रात्री घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मंगळवारी रात्रीपासून पाऊस कोसळला. बुधवारी पहाटेही मूसळधार पाऊस झाला. तर गुरूवारी( दि १६) ला रात्रभर पाऊस सुरू होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४५ मिमी पावसाची नोंद अमरावतीत झाली आहे. अमरावती शहरासह नांदगाव खंडेश्वर, चांदूर, रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड या भागात दमदार पाऊस कोसळला