Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ममुराबाद नदीवरील पुल खचलं, ये-जा साठी नागरिकांची गैरसोय

Responsive Ad Here
खुलताबाद @ प्रतिनिधी 

खुलताबाद तालुक्यातील ममुराबाद येथे धाड नदीच्या महापुर मुळे पुल खचलं असुण अर्धपुल वाहुन गेला आहे व त्यामुळे नागरिकांना दवाखाना, शाळा व अन्य कामासाठी रात्री अपरात्री ये - जा साठी मोठी गैरसोय होत असुण तातडीने काम करून रहदारीला रस्ता पुल बहाल करावे असी मागणी ग्रामपंचायत कार्यकारणी  व ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील ममुराबाद व जानेफळ दरम्यान धाड नदीत पुल असुण रविवारी २८ जुन रोजी अति जोरदार पावसामुळे धांड नदीला मोठा पुर आला यात पुरामुळे पुल खचले असुण अर्धा 



पुल पाण्याने वाहून गेला आहे . पुर्वी ही हाच पुल खचला व वाहून गेला होता त्यावेळी मुरम भरून पुल दुरस्त करण्यात आला होता. आता पुन्हा पुल खचून व वाहून गेला आहे. नागरिक तथा विद्यार्थ्यांना दवाखाना शाळा व अन्य कामासाठी रात्री अपरात्री ये - जा करावी लागते. त्यात पाऊस व पुराचा धडाका सूरुच असल्याने नागरिक परेशान झाले आहे. व ये - जा साठी मोठी गैरसोय होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष घालून तातडीने तात्पुरता पुल दुरस्त करून गैरसोय दुर करावी असी मागणी. सरपंच कृष्णा गावंडे, उप सरपंच गफार शेख, जावेद पटेल, अफसर पटेल सह ग्रामस्थांनी मागणी केली आहे.