खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबादेत कोरोना दाखल होऊन लागण झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.ज्यामुळे संपूर्ण खुलताबाद तालुक्यात भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे. म्हणूनच कोरोनाचा वाढता संक्रमण थंबविणे तसेच नागरिकांत कोरोनाविषयी पसरलेली दहशत कशी दूर करता येईल या वर योग्य ते उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचे लक्षणे आढल्यास रुग्ण स्वतःहुन पुढे यावे अशा नियोजन करण्याची गरज आहे.अशा विविध मुद्द्यांचे निवेदन खुलताबाद येथील लोकप्रतिनिधींनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी औरंगाबाद यांना दिले आहे. या निवेदनात अशे नमूद केले आहे की, औरंगाबाद शहरात जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला की त्याच्या घरी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत धावतात जणु असे चित्र निर्माण होते की एखादा गुनहगार, मोस्ट वॉंटेड अपराधी हाती आला आहे.रुग्णाचे नातेवाईकांना अशा प्रकारे गाडीत बसवण्यात येते की, गुनहगार व चोर वगेरा आहे.यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची मानसिक स्तिथि बिगडुन जाते.आणि त्यांना असा वाटते की आता समाजात आपला सोशल बायकॉट होईल. याच पार्शवभूमीवर खुलताबाद शहर सह ग्रामीण भागांत जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला की संबंधित अधिकारी व कर्मचारी त्या रुग्णाचे घरी जाऊन परिसर सील करतात जेणेकरुन खुलताबाद वासी आता भयभीत झाले आहेत.अशा विविध मुद्द्यांवर शहरातील लोकप्रतिनिधींना
विश्वासात घ्या, संशयित रुग्णांवर घरात औषधोपचार करा, नागरिकांचा कोरोनाविषयी गैरसमज दूर करा व खुलताबाद येथे बाहेरून येणाऱ्यांना आळा घाला, अशी मागणी खुलताबाद येथील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे केली असून तसे निवेदन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना दिले आहे. या वेळेस माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन, नगरसेवक मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन, हद्देखुर्द दर्गाह कमिटी अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजिबोद्दीन हाफिजोद्दीन, इसाक कुरेशी, प्रा. शेख हुसनोद्दीन मोईनोद्दीन यांनी बुधवारी तहसीलदार राहुल गायकवाड यांची भेट घेतली व कोरोनाबाबत येणाऱ्या अडचणीचे निवेदन दिले.
'त्या' व्यक्तींनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी : तहसीलदार राहुल गायकवाड तहसीलदार राहुल गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी प्रामाणिकपणे माहिती द्यावी, जेणेकरून कोरोना संसर्गीय रुग्णावर वेळेत उपचार करणे प्रशासनाला शक्य होईल. तालुक्यातील खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन कोणीही आपले दवाखाने बंद ठेवू नयेत. तथापि उपचार करताना योग्य ती दक्षता घ्यावी. खुलताबाद शहरासह तालुक्यातील सर्व खासगी दवाखाने चालू आहेत असे गायकवाड यांनी सांगितले.
