राजू कलाने अमरावती प्रतिनिधी
या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु बियाणे निकृष्ट असल्यामुळे पेरलेले बियाणे उगवलेच नाही. दुष्काळात तेरावा महिना होऊन आधीच त्रस्त असलेला शेतकरी अजूनच त्रस्त झाला.अनेक बियाणे कंपन्याच्या तक्रारी आल्यानंतर खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कृषी अधिकारी यांना धारेवर धरले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेऊन दोषी कंपन्या व वितरक तसेच विक्रेते यांना समज द्यावी व तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा त्या खाजगी कम्पनी /वितरक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.या संदर्भात कृषी मंत्री दादाजी
भुसे यांचेशी आमदार रवी राणा यांनी भ्रमनध्वनिवर चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या कानावर टाकल्या.कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आमदार रवी राणा यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री चवाळे यांनां बोगस बियाणे पुरविणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात आमदार रवी राणा यांचे निर्देशानुसार अमरावती व भातकुली तालुका कृषी अधिकारी यांनी सदर कंपन्यांविरुद्ध कार्यवाही सुरू करताच कंपन्या नरमल्या व आपली चूक मान्य करून शेतकऱ्यांना बियाणे व सोबतच लागणारा दुबार पेरणीचा खर्च म्हणून नगदी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले.या अनुषंगाने विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तालुक्यातील वासेवाडी येथे हा मदतीचा कार्यक्रम संपन्न झाला.आमदार रवी राणा यांचे शुभहस्ते संतोष मोहोड आसरा,अनिल सवाई उत्तमसरा,संतोष मोहोड आसरा,चंद्रकांत मेहरे उत्तमसरा यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे व नगद अर्थिक मदत देण्यात आली.यावेळी तालुका कृषी अधिकारी कोकाटे मॅडम ,सहायक विस्तार अधिकारी स्वप्नील मेश्राम,पंचायत समिती कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण ,मंडळ अधिकारी सुनंदा दळवी,मंडळ अधिकारी अशोक जाधव आदी उपस्थित होते. हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त जेष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी घेण्यात आला.या प्रसंगी बोलतांना आमदार रवी राणा यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे व शेतकरी शेतमजूर रक्ताचे पाणी करून राबतात व स्वाभिमानाने जगतात त्यांच्या सोबत बेईमानी करणाऱ्याला आपण माफ करणार नाही व शेतकऱ्यांची लूट सहन केली जाणार नाही असा इशारा
आमदार रवी राणा यांनी दिला. शेतकरी शेतमजुरांच्या उनत्तीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,आशिष कावरे, विनोद जायलवाल,राजू हरणे, मंगेश पाटील,पंकज रामेकर,मिलिंद अवघड,महेंद्रशिरसाट ,संतोष कोलटेके, श्री कळसकर, विष्णुपंत संके,उमराव मानकर,नितेश रोकडे ,अंबादास भांबुरकर, किसनराव वानखडे आदी उपस्थित होते
.


