राजू कलाने अमरावती प्रतिनिधी
जून 03 अमरावती महानगर पालिकेचे महापौर तथा अमरावती शहराचे प्रथम नागरिक चेतन गावंडे यांच्या महापौर कार्यालयातील सेवारत शिपाई व महापालिकेतील समुदाय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या दोघांचा अहवाल पॉझेटिव्ह आल्याने अमरावती महानगर पालिकेत सध्या चांगलेच भीतीचे वातावरण आहे आज सम्पूर्ण महानगर पालिकेत फवारणी केली असून सुरक्षेची खबरदारी म्हणून महापौर चेतन गावंडे यांनी सुद्धा दसरा मैदान येथील कोविद सेंटर वर जाऊन स्वतःचे थ्रोट स्वेब दिले तर थ्रोट स्वॅब चा रिपोर्ट येईपर्यंत ते महापौर बंगला येथे कॉरंटाईन राहणार
आहेत आज सकाळी महापौर यांनी डॉक्टरानासोबत चर्चा केली व त्याच्या सांगण्यावरूनच थ्रोट स्वॅब दिलेत महापौर चेतन गावंडे यांना कोरोना संदर्भात कुठलेही लक्षण दिसत नाही त्यांना टॅप,सर्दी,खोकला अजिबात नाही केवळ सुरेक्षतेचा उपाय म्हणून आपण थ्रोट स्वॅब देत आहोत अशी माहिती त्यांनी प्रजासत्ताक सोबत बोलतांना दिली विशेष म्हणजे महापौरांच्या कार्यालयात कार्यरत शिपाई हा गेल्या आठ दिवसांपासून रजेवर आहे त्यामुळे हि बाब थोडी दिलासा दायक आहे पण समुदाय अधिकारी मात्र महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांच्या सम्पर्कात आल्याची माहिती आहे महापौर चेतन गावंडे यांच्या सह आणखी मनपाचे २५ अधिकारी हे कॉरंटाईन झालेले आहेत.

