Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजगृह वरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकर विचार मंचाचे निवेदन

Responsive Ad Here

राजगृह वरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि:- 09/07/2020 रोजी   उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे आंबेडकर विचार मंचाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मधुकर निकम यांच्या नेतृत्वात देण्यात आले. दादर, मुंबई येथे भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे दि : ७/७/२०२० रोजी काही अज्ञात समाज कंटकांनी द्वेषाच्या भावनेतून सर्व असत-व्यस्त करून तोडफोड केली. राजगृह हे सर्वांचे प्रेरणास्थान  असून. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. हे ठिकाण पूर्ण जग भरातील अत्यंत महत्वाचे आहे. या पवित्र ठिकानाची व वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र  निषेध करतो. हे कृत्य द्वेषाच्या भावेंतून केले दिसून येते.  समाजा मध्ये तेड निर्माण व्हावा म्हणून याच्या मागे फारमोठे गुंड प्रवृत्तीचे लोकांचा हात आहे हे नाकरता येत नाही.  या संपूर्ण  प्रकरणाची सखोल चौकशी करावी  व हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर  कार्यवाही व्हावी अशी निवेदनातून विनंती करण्यात आली आहे . 

    या वेळी याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले याप्रसंगी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सदर निवेदनावर आंबेडकर विचार मंचाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मधुकर निकम, महाराष्ट्र अध्यक्ष अजय निकम, महाराष्ट्र संघटक नीलकंठभाऊ वाकोडे, दीपक इंगळे, योगेश निकम आदींच्या सह्या आहेत आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .