Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत मुक्ताबाई-- पांडूरंगाची संत-देव भेट संपन्न

Responsive Ad Here
गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
मुक्ताई चलपादूका सोहळ्याचे  मु्क्ताईनगरकडे प्रस्थान वारकरी संतांचे आराध्यदैवत परमात्मा पांडूरंगाच्या भेटीसाठी आसुसलेल मन विठ्ठल भेटीने तृप्त तृप्त होत आनंदाने भरून आलं . संत  मुक्ताबाईआणि भगवान पांडुरंग देवाचे भेटीचा नयनरम्य सोहळा आज द्वादशीदिनी पंढरपुरी विठ्ठल मंदीरात पार पडला .आषाढी वारी यंदा कोराना महामारी मुळे स्थगित करण्यात आली होती. राज्य शासनाने मानाच्या नऊ दिड्यांना विशेष परवानगी देत शासनाचे देखरेखीखाली विस वारकरी समवेत ‌  पंढरपुरी नेण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एकमेव संत  मुक्ताबाई  संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई  चलपादूका दिंडीचा त्यात समावेश  आहे. एकादशीला पोलीस संरक्षणात चंद्रभागास्नान , नगरपरिक्रमा‌ ,संत ज्ञानेश्वर महाराज कडुन साडीचोळी भेट आदी कार्यक्रम पार पडले . द्वादशीस सकाळी 8वा. मुक्ताई दिंडी श्री विठ्ठल भेटीसाठी दाखल झाली.श्री विठ्ठल मंदीरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी संत मुक्ताबाई चलपादूकांची विधीवत पूजा आरती केली.मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील हभप.रविंद्र महाराज हरणे यांना शाल श्रीफळ देवून सन्मानित केले.श्रीगोमाजी महाराज पादुका नागझरी वतीने हभप.नितीन महाराज यांनी सन्मान स्विकारला.



 जातो माघारी पंढरीनाथा माझे दर्शन झाले आता शासनाने परतीचा प्रवास ठरवून दिल्याप्रमाणे  गुरूवारी दुपारी 11वा.संत मुक्ताबाई पादूका दिंडी ने पंढरपूरातुन  मुक्ताईनगरकडे परतवारी प्रस्थान ठेवले रात्री उशीरा मुक्ताबाई पालखी बस नवीन मंदीर येथे पोहोचेल. गोपाळकाला रविवारी करणार आजपासून पालखी नवे मुक्ताई मंदीरात मुक्कामी राहील. दररोज पुजा भजन रात्री कीर्तन सेवा नित्यनेमाने करण्यात येतील.गुरूपौर्णिमेस 5 जुलैला गोपाळपूरचा  गोपाळकाला उत्सव साजरा होईल.संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा परंपरेने  24जुलै श्रावण शु.4 रोजी मुळ समाधीस्थळी मुक्ताईनगर ते कोथळी  साजरा करून आषाढी वारीची सांगता होईल. जीवनातील परमोच्च आनंदाची अनुभुती यावर्षी कोरोनाचे पाश्र्वभूमीवर वारी होईल की नाही याचीच चिंता महिनाभर सतावत होती.आई मुक्ताईने जवळ करून वारीला नेले.आनंदाला पारावर राहिला नाही.चंद्रभागा स्नान नगर परिक्रमा सकळसंताचे दर्शन झाले.  श्री विठ्ठलाचे दर्शन  मुख्यमंत्री नाही जवळून करीता आले नाही ते  आम्हाला आई मुक्ताईच्या कृपेनेच झाले त्यावेळी सर्वांग रोमांचित झाले तो जीवनात परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवला. महंत नितीनदास महाराज मलकापूर
आता कोठे धावे मन।  तुमचे चरण देखलिया। 
भाग गेला क्षीण गेला। अवघा झाला आनंद।।