शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
विश्व् हिंदू परिषदेचे क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भावरावजी कुदळे हे विदर्भात जळगाव जामोद च्या प्रवासात असताना जामोद येथील कृष्णाई गोशाळेला भेट दिली त्यावेळी त्यांनी गोशाळेची पाहणी केली. त्यावेळेस गाईच्या तबेती चांगल्या असल्याने समाधान वक्त केले आणि परिसरातील प्रत्येक गावामध्ये आपल्या गोशाळेतून एक उत्तम प्रकारचा वळू देण्याचा प्रयत्न
करावा जेणे करुन गाईच्या प्रजाती वाढण्यास मदत होईल व देशी गाईची संख्या कमी होणार नाही व शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील गाईंना कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा करावी लागणार नाही .याकडे लक्ष् देणास सूचना दिल्या त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष व बजरंग दलाचे जिल्हा संयोजक नंदू दलाल, संस्थेचे सचिव सचिन हागे विहिपचे विभाग मंत्री मनोज पाटील
,विहिपचे जिल्हा मंत्री उद्धवजी सातव,बजरंग दलाचे गणेश वसूले, गोशाळा वेवस्थापक पवन सोनोने, भगवान येडे, गजानन हागे, सुभाष पाटील, मयूर पाटील इ. उपस्थित होते.


