Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सातपुड़ा च्या हिरव्यागार पर्वत रांगातील उंबरदेव ते कुवरदेव नदयांमधे खळखळले सौंदर्य!

Responsive Ad Here

शिवदास सोनोने



जळगाव जामोद
तालुक्यात झालेल्या पावसानेत सातपुडा बहरत चालला असुन,नदिनाले वाहू लागल्याने साहजिकच पर्यटक निसर्गाकडे आकर्षीत होत आहेत.
नुकताच श्रावण सुरु झाला असून आकाशात फिरणारे ढग व मधेमधे कोसळणारया सरी या सौंदर्यात आणखी भर घालतात.सध्या जळगाव जामोद तालुक्यातील उंबरदेव ते कुवरदेव या भागातील खाणी,कोरडी,निरवा,आंबलवन,गोरक्षनाथ नदी,पदमावती नदी ,राजुरा , उंबरदेव ची नदी,व अशा जवळपास  21 नद्या ,खळखळ वाहत असून तालुक्यातील हत्तीपाऊल,राजुरा,गोराळा,महाकाली,व मोंढा हे पाच लघूप्रकल्प मधे पाण्याची अवक सुरु झाले असून यापैकी खाणी नदीवरील महाकाली धरण पुर्ण भरुन त्याचा सांडवा वाहत आहे.
सध्या कोरोना च्या प्रतीबन्धमूळे पर्यटक गर्दी न करता दोघे तिघे च्या ग्रुप ने ह्या सौंदर्यचा आस्वाद घेत आहेत.
ह्या भागातील बहुतांश नद्या ह्या उत्तरे कडून दक्षिणेस वाहत जाऊन पूर्णा नदीस भेटतात.
उंबरदेव ते कुवरदेव हा परिसर राखीव वनात येत असून पर्यटकांनी वनविभाग च्या परवानगीने व नियमानुसार या राखीव वनात प्रवेश करावा असे आवाहन वनविभाग कडून करण्यात आले आहे. सध्या कोविड च्या नियमानुसार 3पेक्षा जास्त लोकानी एकत्र वनात जाऊ नये.