Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आ . सुलभा खोडके यांनी मांडल्या उपाययोजना

Responsive Ad Here
अमरावती प्रतिनिधी राजू कलाने

कोरोना संसर्गजन्य आजाराकरीता सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्या संदर्भात सोमवार दिनांक २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली . या बैठकीला पालकमंत्री यशोमती ठाकूर , अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके , जिल्हाधिकारी शैलेश नवाल , मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्यामसुंदर  निकम , मनपा आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस आयुक्त संजयकुमार  बाविस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . हरिबालाजी एन . मनपा  शहर आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दिलीप रणमले  ,  आदी उपस्थित होते . या बैठकीमध्ये आमदार  सुलभा खोडके यांनी शहरात पी १,पी २,प्रणाली अंतर्गत सुरु असलेली व्यापारी प्रतिष्ठाने संदर्भात मुद्दा मांडला . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाप्रशासनाकडून सम -विषम ( ऑड अँड इव्हन )पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्यास गेल्या ५ जून पासून परवानगी दिली आहे  .परंतु या प्रणाली ला घेऊन  नागरिकांमध्ये अनभिज्ञता व संभ्रम निर्माण झाल्याने आपल्या पसंतीचे दुकाने नेमके कधी सुरु आहे , हे निश्चित नसल्याने अनेक ग्राहक हे खरेदीविनाच निराशेने परतत होते . तसेच  सम -विषम पद्धतीने दुकाने सुरु असल्याने नागरिकांची देखील वस्तू खरेदीसाठी एकक गर्दी होतांनाचे दृश्य  बघायला मिळाले . यामुळे सोशल डिस्टंसिंगचे सुद्धा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले . त्यामळे हि प्रणाली व्यापारी व ग्राहकांकरिता गैरसोयीची ठरू पाहत असल्याने पी १ ,पी २ ऐवजी नियमित व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्यासंदर्भात आ.  सुलभा खोडके यांनी या बैठकीत मुद्दा उपस्थित केला . तसेच याबाबत  मागील आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भातील आमदारांसोबत घेतलेल्या वेबिनार मध्ये सुद्धा आ सुलभा खोडके यांनी व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी  नियमित बाजारपेठ सुरु होणे गरजेचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती . दरम्यान या बैठकीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  सुलभाताईंच्या मागणीबाबत  सकारात्मकता दर्शवित  लवकरच निर्णय घेऊन   कार्यवाही करणार असल्याचे सूतोवाच केले . तसेच  ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाही  पण त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली . अशा रुग्णांना डॉक्टरांच्या  सल्ल्यानुसार घरीच उपचार घेता यावा , या विषयावर देखील आ.  सुलभा खोडके यांनी बैठकीत सर्वांचे लक्ष वेधले . जे रुग्ण घरीच क्वारंटाईन  राहून स्वतःची व्यवस्था करू शकतात , त्यांच्या मागे वैद्यकीय यंत्रणा खर्च न करता त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर  होम क्वारंटाईन  केल्यास  गरजू रुग्णांकडे  प्रभावीपणे लक्ष देता येईल ,अशी भूमिका आमदार महोदयांद्वारे मांडण्यात आली .   तत्पूर्वी  यासंदर्भात आ. सुलभात खोडके यांनी इंडियन मेडिकल असोशिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष डॉ . अनिल रोहणकर यांच्याशी चर्चा केली असता कोरोनाची लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला हॉस्पिटल  क्वारंटाईन करण्या ऐवजी डॉक्टरांनी घरीच  जाऊन उपचार करता येत असल्याचे  डॉ .अनिल  रोहणकर यांचे म्हणणे आहे . तर  राज्य शासनाने देखील याबाबत परवानगी दिली असल्याचे आ. सुलभा खोडके यांनी बैठकीत स्पष्ट केले . त्यामुळे अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच  घरीच औषधोपचार करण्याची मुभा मिळावी ,अशी भूमिका आ. सुलभा खोडके यांनी मांडली असता जिल्हा प्रशासनाने यावर सुद्धा सकारात्मकता  दर्शवून  लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले . राज्य शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉग २ चा कालावधी येत्या ३१ जुलै ला संपत आहे . राज्यात या पुढे लॉकडॉन नाही असे सूतोवाच याआधीच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे . त्यामुळे आता १ ऑगस्ट पासून  व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी  नियमित बाजारपेठ सुरु होण्याचे संकेत असून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे .