Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्य शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा-अतिशभाई खराटे

Responsive Ad Here

 कोरणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील 2019- 2020 या शैक्षणिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची तत्पुर्वीची शैक्षणिक संस्थांना देय शिष्यवृत्ती शासनाकडून मिळाली नाही त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क जमा केल्याशिवाय शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मनाई केली आहे व संपूर्ण शुल्क न भरता अर्ज केल्यास अर्ज  बाद करण्याची धमकी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे व ही अन्यायकारक अट अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू केली आहे त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी द्वारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत अतिशभाई खराटे बुलडाणा जिल्हा नेते यांच्या नेतृत्वात देण्यात आले
      बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या अखत्यारीतील भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जारी करीत शैक्षणिक संस्थांना वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये व आवश्यक प्रमाणपत्र द्यावे असा आदेश देत या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,परंतु बौद्ध अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे 
   कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर व संबंधित मंत्र्यांसमोर ओबीसींचा निर्णय घेतल्या जातो परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा  निर्णय घेतल्या जात नाही,राज्य सरकारच्या या धोरणामुळे 2484 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे या सर्व प्रकारामुळे संबंधितांवर कारवाई करावी  व या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांनी तातडीने लक्ष घालून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा 
    सोबतच आधार योजनेचा निधी ,नियमित शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती यांचाही निर्णय अजून  झालेला नाही तरी हा ही  प्रश्न निकाली काढावा .  अन्यथा वरील मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला 
       यावेळी मा.जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव उमाळे,मा.जिल्हाध्यक्ष नारायणराव जाधव,शहर अध्यक्ष शेख यासिन कुरेशी, ता.नेते विलास तायडे,ता.कोषाध्यक्ष गजानन झनके,कृष्णा तायडे आदी उपस्थित होते