नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी अमरावती
कोरोना महामारीच्या काळत लॉकडाउनची परिस्थिती उद्भवल्याने सामान्य माणूस आधीच तिन महिने बंदिस्त परिस्थितीत असताना कुठलाही व्यवसाय, रोजगार हाताशी नसताना जनतेने स्वतःची पोटं भरायची व्यवस्था करायची की ५०००, ८०००, १०००० याप्रमाणात मनमानी दिलेली विज देयके भरायची?- आमदार प्रताप अडसडमहाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व वितरण कंपनीच्या भोंगळकारभारामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त झालेली आहे. महावितरण कंपनीने अवास्तव बिले विद्युत ग्राहकांच्या माथी मारल्यामुळे कंपनीच्या विरोधात जनतेमध्ये भयंकर रोष उत्पन्न झाला आहे.आमदार प्रताप अडसड यांनी लॉकडाऊन जाहीर झालेल्या काळातील संपूर्ण ग्राहकांचे विद्युत देयके पुर्णपणे माफ करण्याची रास्त
मागणी केली.एखादवेळेस विज कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे बिले योग्य पद्धतीने दिले असतील तरीही मध्यम वर्ग, सामान्य परिस्थितीत असलेल्या व गरीब वर्गाची ही बिले भरण्याची आज अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे विद्युत देयके माफ करणे हे शासनाच्या धोरणात्मक बाबी मध्ये येत असल्याने विद्युत देयके माफ करा. आता लॉकडाऊनला थोडी उसंत भेटता क्षणी ग्राहकांना अमाप बिले पाठवली. लॉकडाऊनमुळे जनता आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आली आहे. अशात महावितरणने पाठवलेली बिले भरणार कशी? असा सवाल आमदार प्रताप अडसड यांनी केला तरीही निगरगट्ट शासनावर याचा काहीच फरक पडत नाही व सामान्य नागरीकांच्या बद्दल काहीच वाटत नाही असे दिसत आहे.
