Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मध्य प्रदेशातून येणारा २५ लाखांचा दारू साठा जप्त; दोन जण ताब्यात

Responsive Ad Here

राज्याच्या सीमालगत भागातून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपीना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोर्शी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य आणि बिअरचा साठा तसेच एक मालवाहू ट्रक असा अंदाजे २५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास सालबर्डी -हिवरखेड मार्गावर हि कारवाई करण्यात आली.
मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भागातून अमरावती जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोर्शी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास सालबर्डी-हिवरखेड मार्गावर मालवाहू ट्रक क्र. एमएच ४०/व्हीजी ८३१८ ताब्यात घेण्यात आला. ट्रकही तपासणी केली असता विदेशी मद्य आणि बीअरच्या ४६६ पेट्या त्यात दिसून आल्या. ट्रकमधील रितेश आर्य आणि निलेश शिवहरे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण २४ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. राज्य उत्पादन शुल्क विभाग पुढील कारवाई करीत आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक के.जी.आखरे, मोर्शीचे सहायक निरीक्षक रवी राऊतकर, राहुल जयस्वाल,सुजित जाधव यांनी केली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.