Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वलगाव आणि व्हीएमव्ही येथील विलगीकरण कक्षांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर

Responsive Ad Here
 अमरावती, दि. १७ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून याकरिता आता वलगाव आणि व्हीएमव्ही महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाचे आता कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आज सायंकाळ पासून हे दोन्ही कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असून यामध्ये तब्बल ३५० रुग्णावर उपचार करता येणार आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण हे फार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. या रुग्णांवर चांगला उपचार व्हावा याकरिता जिल्हा प्रशासन नेहमीच चांगले करण्याच्या प्रयत्नांत असते. ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळून आल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करण्याकरिता आता वलगाव येथील विलगीकरण कक्ष व विएमवी महाविद्यालयातील वसतिगृह हे सज्ज करण्यात आले असून या दोन्ही सेंटरमध्ये डॉक्टर,नर्स,बेड आणि ऑक्सिजन यासर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली. वलगाव येथील सेंटरमध्ये ३ हॉल व ३६ रूम उपलब्ध असून या ठिकाणी २०० रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात तर विएमवी महाविद्यालयातील सेंटरमध्ये जवळपास १५० रुग्ण उपचार घेऊ शकतात, त्यामुळे येणाऱ्या काळात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी आधीच पुरेशी व्यवस्था करण्याची खबरदारी घेतली आहे.

 बालकांसाठी एनआयसीयु कक्ष

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोविड -१९ रुग्णालयात नवजात शिशूंसाठी एनआयसीयु कक्षाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या व्यवस्थेमुळे नवजात शिशूंच्या प्रकृतीवर  देखरेख आणि त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे होणार आहे. 

मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

रुग्णालयात उपचार घेत असतांना रुग्णाचे मानसिक स्वस्थ उत्तम राहणे देखील तितकेच गरजेचे असते त्यामुळे आयुष कक्षाच्या साहाय्याने कोविड -१९ रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकरिता झूम ऍपच्या माध्यमातून मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुरु करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. डॉ. श्रीरंग ढोले यांच्या रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये हा प्रयोग सुरु करण्यात आला असून त्याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
Add caption