अमरावती प्रतिनिधी राजू कलाने
दिनांक 3 जून रोजी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाचे पाणी विविध ठिकाणी साठवून प्रवासाला आळा बनलेले आहे. तसेच यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणारा थिलोरी या गावांमध्ये झोपतच मालाच्या कामाला हात लावला होता.मात्र त्या कामाला एकच दिवस काम चालू होऊन झाले असल्याने काल सायंकाळी पावसाच्या पाण्याने त्या बांधा फुठून संपूर्ण पाणी हे या थीलोरी गावांमध्ये शिरले . ज्यामुळे गावातील जवळपास 80 ते 90 घरांमध्ये पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच गावातील नागरिक हे दुसऱ्या गावाकडे पलायन करीत आहेत.कारण जीवनावश्यक वस्तू ह्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.माझं जीवन जगण्याकरिता स्थानिक नागरिकांचे जे नुकसान झाले त्यामुळे ते आपल्या उदरनिर्वाहाकरिता दुसऱ्या गावाकडे जात असल्याचे चित्र आज या गावातील नागरिकांची परिस्थिती दिसत आहे.ज्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ता तसेच
राजकीय पक्षाचे नेते, आमदार खासदार, राज्यमंत्री, पालकमंत्री या सर्व प्रकाराला कितपत पाठबळ देईल किंवा नाही या घटनेकडे संपूर्ण नाही तर अमरावती जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. मात्र अशा मध्येच दर्यापूर विधानसभेचे लाडके आमदार वानखडे यांनी गावांमध्ये जाऊन पाहणी करून संपूर्ण नागरिकांची सांत्वना व्यक्त केली .

