Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सहदेवराव भोपळे विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Responsive Ad Here

प्रतिनिधी हिवरखेड@ जितेश कारीया


येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय चा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२० चा सेमी इंग्रजी माध्यम चा निकाल १००%  व मराठी माध्यम चा निकाल ९६.२० % लागला आहे. विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचे नाव पुन्हा उंच शिखरावर कोरले आहे. निकालात शाळेतून  १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ५८ विद्यार्थी प्राविण्य तर ३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून एकूण १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व  शाळेचा एकत्रित निकाल ९७.८१ % लागला आहे.
यामध्ये इंग्रजी माध्यम मधून प्रथम क्रमांक कु. दिव्या दिलीप नाठे ९५.४०%,  द्वितीय क्रमांक चि. प्रतीक संजय राऊत ९५.२०% , तृतीय क्रमांक चि. कृष्णा हरीदास बाभुळकर ९३.८०% , संयुक्तरीत्या चतुर्थ क्रमांक कु. साक्षी गजानन भालतिलक ९३.४०% ,चि. अनिकेत मनोज देशमुख ९३.४०%, पाचवा क्रमांक कु. प्रिती घनश्याम राठोड ९३% यांनी पटकावला असून १३  विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या वर गुण घेतले आहेत. त्याचप्रमाणे विद्यालयातून मराठी माध्यम मधून प्रथम क्रमांक कु. गायत्री रवींद्र मोरोकार ८३.६०% , द्वितीय क्रमांक कु. अंबिका प्रकाश गावंडे ८२.६०% , तृतीय क्रमांक कु. दिशा नंदकिशोर केरोडीवाल ८१.८०%, चतुर्थ क्रमांक कु. साक्षी दिलीप सोनोने ८०.४०% व पाचवा क्रमांक कु. पायल विनोद बाभुळकर ७८.२०  टक्के या विद्यार्थ्यांनी पटकावले आहे.
या निकालाबद्दल संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, ज्येष्ठ संचालक तथा संस्थेचे माजी अध्यक्ष  सत्यदेवराव गिऱ्हे ,  सहकार्यवाह श्यामशील भोपळे, तसेच संस्थेचे समस्त पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशासाठी तत्कालीन मुख्याध्यापक प्रमोद जानोतकर, नवनियुक्त मुख्याध्यापक राजेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनात वर्गशिक्षक अभिजीत भोपळे व वर्गशिक्षिका कु. रजनी वालोकार, मार्गदर्शक शिक्षिका तथा पर्यवेक्षिका कु.रंजना अंजनकर,रंजित राठोड,प्रशांत भोपळे, नितीन निमकर्डे, श्रीकांत परनाटे , संतोष राऊत यांच्यासह आदी शिक्षकांनी शैक्षणिक परिश्रम घेतले.