जुलै 08
अचलपूरच्या नःप मुख्याधिकारीपदी राजेंद्र फातले
अचलपुर न प मुख्याधिकारी ह्यांच्या ह्यांच्या काल संध्याकाळी तडकाफडकी झालेल्या बदलीमुळे जनता संतप्त झाली असून त्यांची बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात येत आहे या संदर्भात अचलपूर परत वाड्यातील जागृत लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनमार्फत राज्यपालांना दिलेले निवेदन असे की , अश्विनी वाघमळे येथे कार्यरत असताना अचानक त्यांची दिनांक ६ जुलै २०२०रोजी नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य उपसचिव यांच्या आदेशानुसार बदली तथा कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले, मुख्याधिकारी म्हणून वाघमले यांचा कार्यकाळ सक्षम राहिला असून, जुळ्या शहराला कोरोना मुक्त ठेवून जनतेच्या आरोग्य व सुरक्षेसाठी आपले जीव मुठीत घेऊन अहोरात्र त्यांचे कार्य राहिले आहे त्या कर्त्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून उत्कृष्ठ कार्य करत असताना जुळ्या शहरातील सर्व नागरिकानी त्यांच्या कार्याची सर्वस्तरातून प्रशंसा केली आहे.
कोरोना संसर्गच्या नाजुक वेळी अचानक प्रशासन कडून त्यांची बदली बाबत नागरीक व सर्व सामाजिक संगठनांमधे रोष वाढत आहेत्यामुळे जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुख्याधिकारी वाघमळे यांची बदलीला स्थगिती द्यावी निवेदनावर योगेश खानजोडे, धनंजय नाकिल, संतोष नरेडी, कमल केजड़ीवाल, राजकुमार बरडिया,राजेंद्र मूंदे, संजय डोंगरे,सुरेश प्रजापती, अक्षय उमप, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

