नेवासा: नेवासा प्रतिनिधी सागर रासकर तालुक्यातील भेंडा,कुकाणा,परिसरातील खत
दुकानदार शेतकर्यांची अडवणूक करत असल्याची तक्रार तालुका
कृषीअधिकरी यांना करून ही कारवाई केली नसून तालुका कृषी
अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.नेवासा तालुका मध्ये भेंडा,कुकाणा
येथील खत दुकान दार खत शिल्लक असतानाही शिल्लक
नसल्याचे सांगतात.
तालुक्यातील खत विक्रेते युरीया खतांसोबत इतर खते घेण्याची
सक्ती करत असून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे.
शेतकऱ्यांची होत असलेली लूट कशा प्रकारे सुरू आहे याची
माहिती देऊन ही तालुका कृषी अधिकारी यांनी कोणतीही
कारवाई केली नाही, युरिया खत शेतकऱ्यांना विक्री करतांना
सोबत इतर खत घ्यावे असा आग्रह होत असल्याचा आरोप
शेतकरी वर्ग करत असतो त्याचे मूळ खत उत्पादक कंपनी आहे
सदर कंपनी विक्रेत्यांना इतर खते घेतली तरच युरिया पाठवतात
आणि जर कोणी विक्रेत्यांनी विरोध केला तर त्याला कोणीही
युरिया देत नाही कृषी अधिकारी स्वतः युरिया रेख वाटप करतात
असे डीलर सांगतायेत नक्की युरिया कोण पळवतो कंपनी कडुनअसे डीलर सांगतायेत नक्की युरिया कोण पळवतो कंपनी कडुन
इतर खताची सक्ती का केली जाते याची चौकशी करून संबंधित
युरिया उत्पादक कंपन्यांनवर कायदेशीर कारवाई करावी आणि
शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देतानी इतर खताची सक्ती
होणार नाही याची दखल घ्यावी.
तालुका कृषी अधिकारी यांना वांरवार सांगून व निवेदन देऊन ही कारवाई
नाही
विशेषत युरिया शिल्लक असतानाही शिल्लक नसल्याचे सांगून
युरिया खत दिले जात नाही.शेतकर्यांना दादागिरी व दमदाटीची
भाषा करतात. अनेक वेळा सांगून ही कारवाई करत नसून
प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.