अमरावती प्रतिनिधी @ राजू कलाने
| आरोपींना अटक करून फास्टट्रॅक कोर्टा मार्फत कठोर शिक्षा झालीच पाहिजे . . . जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ कलाने |
राजगृह वरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दि:- ९/७/२०२० रोजी मा.ना. मुख्यामंत्री उद्धवजी ठाकरे साहेब , मा.ना.गृह मंत्री अनिल जी देशमुख साहेब व मा.ना. बालकल्याण मंत्री पालक मंत्री यशोमती ताई ठाकूर यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ कलाने यांच्या नेतृत्वात देण्यात आले. दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे दि : ७/७/२०२० रोजी काही अज्ञात समाज कंटकांनी द्वेषाच्या भावनेतून सर्व असत-व्यस्त करून तोडफोड केली. राजगृह हे सर्वांचे प्रेरणास्थान असून. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. हे ठिकाण पूर्ण जग भरातील अत्यंत महत्वाचे आहे. या पवित्र ठिकानाची व वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र तीव्र निषेध करतो. हे कृत्य द्वेषाच्या भावेंतून केले दिसून येते. समाजा मध्ये तेड निर्माण व्हावा म्हणून याच्या मागे फारमोठे गुंड प्रवृत्तीचे लोकांचा हात आहे हे नाकरता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तात्काळ फास्टट्रॅक कोर्टा मार्फत कठोरात-कठोर कार्यवाही व्हावी अशी निवेदनातून विनंती करण्यात आली आहे .
या वेळी जिल्हा अध्यक्ष सागर कलाने यांच्या सह प्रमुख उपस्थित अमरावती शहर अध्यक्ष आशिष भातकुले ,जिल्हा उपाध्यक्ष- मयूरभाऊ मेश्राम , समाज सेवक सुरेशभाऊ स्वर्गे , सोशल मीडिया प्रमुख- जितेश भाऊ अंभोरे बाबरावजी हिवाराळे , शहर उपाध्यक्ष - सोहमभाऊ उजेनकेर , संतोषभाऊ शिंदे , अजयभाऊ तायडे , अभयराव गाडे , पृथ्वीभाऊ शाहरे , सुरेशभाऊ महोरे ,आशिषभाऊ सिरसाट , सुरजभाऊ ओळंबे , अश्विनीताई थोरात , अशा ताई तायडे , स्नेहलताई सोनोने , वैभव खडसे , प्रवीण खंडारे , अमोल जोंधळे , प्रतीक शिंदे , श्याम भाऊ वासनिक , रवी उईके , संतोष आठवले आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

