Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अंबिकादेवी विद्यालयाचे निकालात सातत्य

Responsive Ad Here

तिनिधी हिवरखेड@ जितेश कारीया


          नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सौन्दळा येथील श्री अंबिकादेवी विद्यालयाने यावर्षी सुद्धा आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.या विद्यालयाचे एकूण 74 विद्यार्थी यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 85.13 %आहे.विशेष म्हणजे 29 मुलींपैकी सर्वच्या सर्व म्हणजे 29 मुली उत्तीर्ण झाल्या असून विद्यालयातून सुध्दा प्रथम तीन क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत.कु.गौरी विठ्ठल डाखोरे हिला 95.40%,कु. राधिका संजय शेवायणे हिला 94.80% तर  कु. वैष्णवी राजेश डोबाळे हिला91.80% गुण मिळाले असून त्या विद्यालयातून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आल्या आहेत.या विद्यालयात वारी,पिंपरखेड या आदिवासी गावातील तसेच सौन्दळा,वारखेड, सोनवाडी, कार्ला इ.गावातील सर्व गरीब -अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेतात.कुठल्याही खासगी शिकवणी शिवाय या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच उत्तुंग होय अशी प्रतिक्रिया संस्थाध्यक्ष श्री शंकरराव पुंडकर गुरुजी यांनी दिली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन संचालक मंडळाने केले असून विध्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य ठाकरे सर तसेच शिक्षक श्री कराळे सर,खूपसे सर,घुंगड सर,टाले सर,अटराळे सर ,सौ.राहाणे मॅडम यांना देतात.