प्रतिनिधी :- पवन चव्हाण
संग्रामपुर : तालुक्यातील सोयाबिन बियाण्याची उगवण झाल्या नसल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागात शेतक-यांनी दिल्या आहेत. या संदर्भात आलेल्या तक्रारी नुसार कंपनी प्रतिनीधी शेतक-यांन सोबत संपर्क साधुन भरपाई देतो म्हणुन तक्रारी मागे घेण्या करीता शेतक-यांना प्रोत्साहीत करीत आहेत. तसे शेतक-यान कडुन अर्ज भरुन घेउन नुकसान भरपाई न देता कंपन्या शेतक-यांची फसवणुक करीत असल्याचे समोर आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विभागा सह संबधितांना दि. १४ जुलै रोजी पत्राव्दारे नुकसान भरपाई म्हणुन एक सोयाबिन बँग मागे ५७०० रुपयाची भरपाई शेतक-यांना द्यावी. अशी मागणी केली आहे. काही कंपन्यानी वेळ मागुन भरपाई देण्याच्या मानसिकतेत असल्याचे पत्र कृषी विभागाने १० जुलै रोजी डिक्कर यांना दिले होते. पंरतु कंपन्या वेळ काडु पणाचे धोरण अवलंबत असल्याने शेतक-यांना मानसिक त्रासाला सामोरं जाव लागत आहे. कंपनिने शेतक-यांना बँग ची रक्कम अधिक पेरणीचा खर्च ३५०० रुपये असे प्रत्येक बँग ला एकुण ५७०० रुपये नुसान भरपाई शेतक-यांना देण्याची मागणी डिक्कर यांनी कृषी विभागाकडे केली आहे. जर कंपन्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यास टाळा टाळ करीत असतिल तर तात्काळ कंपन्यावर गुन्हे दाखल करा. कंपन्या विरोधात कृषी विभाग कारवाई करीत नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कंपन्या सोबतच कृषी विभागाच्या अधीका-यांनाही जेलची हवा दाखवणार असल्याचा सज्जड ईशारा प्रशांत डिक्कर यांनी संबधित कृषी विभागाला दिला आहे.
![]() |
| Add caption |

