अमरावती प्रतिनिधी राजू कलाने
स्थानिक राहटगाव परिसर येथील राहतगाव ते न्यू iti कॉलेज मुख्य मार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासून पथदिवे चा प्रश्न प्रलंबित होता. रात्रीबेरात्री नागरिकांना येजा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे, ह्या दोन तीन वर्षात तर लूटमार, विनयभंग, छेडछाडीचे प्रकरणे होत होते, मागील काही दिवसांगोदार पासून लुटमारीचे प्रकरणे वाढत होते, अनेक वर्षांपासून नागरिकांनी अनेक निवेदने देऊनही कोणती कार्यवाही झाली नव्हती पण नवनिर्वाचित आमदार सुलभाताई खोडके यांनी अखेर हा प्रश्न मार्गी लावला आणि तीन महिन्यापूर्वी MSEB च्या अधिकाऱ्यांना तात्काळ पथदिवे लावण्याचे आदेश दिले आणि आज रोजी दि: ३० जून रोजी संपूर्ण मार्गावर ३ किलोमीटर पर्यंत पथदिवे लागले व आज अमरावती शहराच्या कर्तव्यदक्ष आमदार सुलभाताई
खोडके यांच्या शुभहस्ते पथदिवे सुरू करण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी श्री संजयभाऊ खोडके (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस), गुड्डू धर्माळे (कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टी अमरावती), प्रमोद महल्ले (माजी नगरसेवक), योगेश सवाई, निंभोरकर साहेब mseb अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पथदिव्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विकास घाटे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन दिनेश डोंगरे यांनी केले.सात बंगले परिसर आणि न्यू ITI कॉलेज परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.प्रसंगी परीसरातील सर्वश्री बंडुभाऊ जोंधळे, विकास घाटे, गवळी काका, पातूरडे काका, सर्वटकर काका, ठाकरे काका,भिसे काका, प्रवीण यादव, बाबूलाल मोहोड, कदम साहेब, गिरी काका,ठाकूर भाऊ, खेडकर काका, वर्धे काका, टिंगणे भाऊ, कातखिडे काका, राऊत सर, धुर्वे साहेब, पर्वतकर काका, एकापुरे काका, श्रीकांत डोंगरे, प्रणय डांगे, प्रशांत कीटूकले आदी नागरीक उपस्थित होते.

