प्रतिनीधी/मुकेश हातोले ता.पातुर
वाढत्या दुष्काळ भागातील परिस्थिती पाहून व खुप वर्षांपासुन अनियमीत होणारा पाऊस, त्यामुळे खुप सार्या राज्यांमध्ये खुप मोठ्याप्रमाणात उद्भवलेल जलसंकट व वातावरणावर होणारा परिणाम याचे एकमेव कारण काय असेल तर ते आहे आपल्या देशात फार मोठ्याप्रमाणात होत असलेली "वृक्षतोड" त्यामुळं सर्व जनता त्रस्त तर आहेच आहे.
पण वृक्षतोड होत असल्याने शेतकरी राजा खुप जास्त प्रमाणात भरकटला जात आहे.
या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांनी पुर्ण जिल्ह्यामथ्ये एक उपक्रम राबवित आहेत तो उपक्रम म्हणजे "झाडे लावा, झाडे जगवा" या उपक्रमात कमीत कमी ५००० (पाच हजार) झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलला आहे व त्याची सुरुवात सुध्दा केली आहे.
चौंढी,पातुर,बाळापुर, मुर्तिजापूर,मांडवा,तुलंगा बु, रिधोरा,व आज दिनांक:-१४/७/२०२०रोजी सस्ती येथे मा.सतीश देवराव हातोले संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.प्रज्वलभाऊ तायडे(तालुका प्रवक्ता) यांच्या नेतृत्वाखाली आज सस्ती येथे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून लाभलेले मा.सुनिलभाऊ तायडे,मा.नकुलभाऊ वावगे सरोदय मंडळाचे कार्यकर्ते मा.निलेशभाऊ मसने,मा.गजाननभाऊ राऊत,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे प्रत्येक एक दिवसात ग्रामीण युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या
मार्फत वृक्षारोपण करणे सुरु आहे
.

