येवला प्रतिनिधी माधव नेहे
तालुक्यातील नागडे येथील पैठणी कारागीर अश्विनी बोदाडे यांच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने त्यांच्या घरातील हातमागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने जीवित हानी झाली नाही त्यामुळे अनर्थ टळला दरम्यान या घटनेत हात मागाचे सुमारे अडीच लाख रुपये नुकसान झाले अश्विनी बोदाडे व त्यांचे पती कमलेश यांचा थोडक्यात जीव बचावला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक अडचणीत असताना बोदाडे परिवार हा प्रसंग आल्याने हल हल व्यक्त होत आहे नेहमी प्रमाणे हातामगावर काम करीत असतानाच शुक्रवारी सकाळी ६.४५च्या सुमारास घराची भिंत कोसळली गेल्या दोन दिवस तालुक्यात पावसाचा तडका सुरू होता त्या मुळे भिंती मध्ये पाणी मुरल्याने भिंत हातमागावर कोसळली त्यात
दोनीही हातामगाचे नुकसान झाले दोन्ही मागावर प्रत्येकी एक लाखाचे ब्राकेत पैठणीचे काम सुरू होते मात्र काही क्षणातच या घटनेने होत्याचे नव्हते झालेविणकाम व्यवसाय उभारणीसाठी बँकेचे लोन घेतले होते व त्याचे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न उभा राहिला असून महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी करतो तसेच मा- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना फॅक्स द्वारे निवेदन दिल असून फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल जी भावसार व उपाध्यक्ष संजय करंजकर तसेच विंचूर लासलगाव अध्यक्ष
अंकुश गाढवे व पदाधिकारी राजेंद्र गणोरे, दीपक जाधव, सुनिल पवार, राहुल साबळे आदमाने सागर गोसावी राहुल चव्हाण प्रमोद डुकळे शुभम देवकर कुणाल टिभे आदी च्या स्वाक्षरी आहेत महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मदत करावी शिवसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कुणाल भावसार यांची मागणी.


