नेवासा प्रतिनिधी सागर रासकर
आषाढी एकादशीनिमित्त देवगड संस्थान महंत भास्करगिरी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन देवगड येथे किसनगिरी बाबांच्या पादुकांची क्षेत्र प्रदक्षिणा करत पूजन करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात झालेल्या क्षेत्र प्रदक्षिणाप्रसंगी विठोबा रखुमाई ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर करत भजने गायली गेली. यंदा कोरोनाचे संकट ओढवल्याने पंढरपूरचा पायी दिंडी सोहळा रद्द झाला. त्यामुळे वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना मोठे दु:ख झाले. वारीचा आनंद सर्वांना घेता आला नाही. अनेक देवस्थाने बंद होती. यामध्ये देवगडचाही
![]() |
| Add caption |
समावेश होता. आषाढी एकादशीला तरी बाबांच्या पादुकांची छोटेखानी क्षेत्र प्रदक्षिणा व्हावी असा भास्करगिरी महाराज यांचा प्रयल होता. यावेळी टाळ मृदंगाचा गजर करणाऱ्या मोजक्याच वारकऱ्यांनी प्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये मास्क घालून व सामाजिक अंतराचे पालन करत भजने गायली. त्यानंतर भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयासह किसनगिरी बाबांच्या पादुकांचे पूजन करून अभिषेक घालण्यात आला. यावेळी मोजके वारकरी उपस्थित होते. संचारबंदीच्या काळात मंदिरपरिसरात स्वच्छता तसेच सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. त्यमुळे देवगडच्या वैभवात भर पडली आहे.
