Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लातूरात आता घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस.

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड


लातूर शहर महानगरपालिकेने आता घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले आहेत.या माध्यमातून घंटागाडी नेमकी कोठे आहे ? ती थांबली आहे की रस्त्यावरुन धावत आहे ? यासह सर्व माहिती मोबाईलच्या साहाय्याने उपलब्ध होणार आहे.या माध्यमातून महापालिकेने तंत्रज्ञानाच्या मदतीने घनकचरा व्यवस्थापनाकडे सक्षम पाऊल टाकले असुन या व्यवस्थेमुळे अधिका-यांना कार्यालयातुन घंटागाडी वर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांना या प्रणालीत सामावून घेतले जाणार आहे.असुन त्यामुळे कचरा व्यवस्थापन पारदर्शक होण्यास मदत होणार व कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी सर्व घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.