संतोष वेंदे कल्याण प्रतिनिधि
काल्याण: उदयापासून सावळाराम क्रिडा संकुल येथील सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर सुविधा सुरू होणार असे प्रतिपादन सन्मा.खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज केले. महापालिका क्षेञातील रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अधिक चांगले उपचार देण्याच्या दृष्टीकोनातुन सावळाराम क्रिडा संकुल डोंबिवली येथे 30 बेडचे आयसीयु असलेले व 155 ऑक्सीजन बेडसचे डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर कार्यान्वित होणार असून त्याची पाहणी सन्मा. खासदार श्रीकांत शिंदे ,महापौर विनिता
राणे, तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी ( देवनपल्ली ), उपायुक्त मिलींद धाट व इतर अधिकारी वर्ग यांनी केली, त्यावेळी मा.खासदारांनी हे प्रतिपादन केले.सावळाराम क्रिडा संकुलाप्रमाणेच डोंबिवली जिमखाना , टेनिस कोर्ट , पाटीदार हॉल तसेच कल्याण मधील आर्ट गॅलरी व आसरा स्कुल येथे सुमारे 1000 बेड ची सुविधा महापालिका, कोव्हिड 19 रूग्णांसाठी करीत आहे, अशी माहिती खासदार यांनी यावेळी दिली.शास्ञीनगर
रूग्णालयावरती प्रचंड ताण असून सावळाराम क्रिडा संकुलातील डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर कार्यान्वित होत असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. टेस्टिंग वाढल्यामुळे केसेसचे प्रमाण वाढले आहे. परंतू लोकांनी त्यासाठी घाबरून जावू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

