Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिवसा पथदिवे सुरू : विजेची उधळण थांबवावी! अॅड. विनोद बोरसे यांची मागणी

Responsive Ad Here

सतिष बोरसे 


धुळे : येथील मार्केट यार्ड परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील भगा  मोहन नगरातील शिव साई मंदिरासमोरील हायमाष्ट लैंम्प तसेच शहरातील कमलाबाई हायस्कूल जवळील पथदिवे दि. ३० जुलै रोजी गुरूवारी दिवसा देखील सुरू होते. त्यामुळे विजेचा अपव्यय सुरू होता.धुळे महानगरपालिका प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष द्यावे व विजेची उधळण थांबवावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड.विनोद बोरसे यांनी केली आहे
    ठोस कारवाई व्हावी !
धुळे शहरात दररोज कुठल्या ना कुठल्या तरी भागात पथदिवे व हायमास्ट दिवसा देखील सुरू राहण्याचे प्रकार घडत आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून या विषयी मी आवाज उठवित आहे.वेळोवेळी या घटनांना  प्रसिद्धी माध्यमातून वाचा फोडण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत.खंत या गोष्टीची वाटते की, धुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व नगरसेवक तसेच महानगरपालिकेवर अंकुश ठेवणारे राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते  ,शहरातील अन्य पक्षांचे पदाधिकारी हे शहरात दिवसा ढवळ्या होणाऱ्या विजेच्या उधळपट्टी कडे कसे दुर्लक्ष करू शकतात.संबंधित प्रशासकीय यंत्रणा व शहर विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या पुढाऱ्यांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे,अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई व्हावी !
     अॅड. विनोद बोरसेसामाजिक कार्यकर्ते तथा अभियान प्रमुख माझा प्रभाग - माझा सहभाग अभियान प्रभाग क्रमांक अकरा, धुळे