पातूर ता. प्रतिनीधी @ मुकेश हातोले
पातूर: शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील रेणुका नगर भाग जिरायत येथील अंगणवाडीला दिनांक 28/7/2020 रोजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल फाटकर यांनी भेट दिली असता यावेळी अंगणवाडी सेविका सौ निशा वसंत गाडगे यांनी जि प सदस्य सुनिल फाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच यावेळी प्रमुख उपस्थित असलेले सागर भाऊ रामेकर यांचे सुद्धा अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य सुनिल फाटकर यांनी अंगणवाडी ची पाहणी केली. तसेच अंगणवाडी सेविका निशा गाडगे यांच्या विनंतीवरून जि प सदस्य सुनिल फाटकर यांच्या हस्ते अंगणवाडीचा माल वाटप करण्यात आला. यावेळी सुनिल फाटकर यांनी लवकरच आपल्या अंगणवाडीचा आणखी विकास करणार असे आश्वासन दिले. यावेळी अंगणवाडी येथे अंगणवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी अंतर्गत येत असलेले तीन ते सहा वयोगटातील बालक व त्यांचे आई-वडील तसेच नगरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

