Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रसूतिकळा नसताना सुद्धा एका डॉ ने जबरदस्ती महिलेची प्रसूति केली त्यात बाळाचा मृत्यु

Responsive Ad Here
शिवदास सोनोने   प्रतिनिधी बुलढाणा
प्रसूतिकळा नसताना जबरदस्तीने गर्भ पिशवित हात घालून डॉ ने केली प्रसूति, त्यात बाळाचा मृत्यु.....धक्कादायक प्रकार...

पोलिसात तक्रार देऊनही कुठलीच कार्रवाई नाही..
प्रसूतिकळा नसताना सुद्धा एका डॉ ने जबरदस्ती महिलेची प्रसूति केली त्यात बाळाचा मृत्यु झाल्याची घटना जळगाव जामोद येथे घडली असून या घटनेची तक्रार जळगाव जामोद पोलिसात केली आहे मात्र पोलिसातर्फे संबधित डॉ विरोधात कुठलीच कार्रवाई केली नसल्याने पीड़ित महिला व तिचा पति न्यायाची भिक मागत आहे ... 
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील सौ शारदा भोंगळे या महिलेचे प्रसूति संदर्भात उपचार जळगाव जामोद येथील डॉ महिला सौ उज्वला पाटील यांच्यकडे सुरु होता डॉ सौ उज्वला पाटील ह्या शासकीय सेवेत असून त्या तालुका वैद्यकीय अधिकारी  म्हणून कार्यरत आहेत मात्र डॉ उज्वला पाटिल यांचे पति डॉ अविनाश पाटील यानी पेशंट शारदा हिला स्वतः च्या क्लिनिक्समद्धे नेऊन तिला प्रसूति कळा येत नसताना तिची प्रसूति जबरदस्ती ने केली महिलेच्या गर्भपिशवित हात घालून बाळाची ओढातान करीत बाळाला बाहेर काढले त्यात बाळाचा मृत्यु झाला , अंगावर काटा आननारा व धक्कादायक प्रकार विक्षिप्त डॉ अविनाश पाटिल यानी केलाय , स्वतः पीड़ित महिलेने आपबीती कथन केलि    पीड़ित, सौ शारदा संजय भोंगळे
================================================
========================================================================
 या घटनेची तक्रार महिलेच्या पतीने डॉ समाधान पाटील यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलिसात केली आहे मात्र पोलिसांनी कार्रवाई न केल्याने पीड़ित महिला व तिचा पति ने न्यायाची मागणी केली आहे 
संजय रामदास भोंगळे, पीड़ित महिलेचा पति , आसलगाव


 पोलिसांना विचारना केली असता या घटने संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली , कॅमेरा
 समोर बोलन्यास पोलिसांनी नकार दिला.
या घटनेची तक्रार माझ्यापर्यंत पीड़ित महिला किवा पोलिसांनी अद्याप पर्यन्त दिली नाही माझ्याकडे तक्रार प्राप्त होताच चौकशी करुण दोषी आढल्यास कार्रवाई केल्या जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित यानी दिली .
 - डॉ प्रेमचंद पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा
 मी वैद्यकीय नियमानुसार सौ शारदा भोंगळ या महिलेची प्रसूति केली आहे तिला प्रसूति कळा येत असल्यानेच प्रसूति केली आहे मी कुठलेही चूक केली नसल्याचे डॉ समाधान पाटील यानी सांगितले तसेच मातेच्या पोटातच बाळाच्या नाळेला गाठ पडली होती अशी माहिती डॉ पाटील यानी दिली.
 डॉ अविनाश पाटील, जळगाव जामोद