केशव सातपुते@लोणार तालुका प्रतिनिधी.
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सदैव रस्त्यावर:- संस्थापक बाळासाहेब सानप
अल्पकाळातच राज्यभर आपल्या कार्याच्या माध्यमातून समोर आलेले संघटन म्हणजे, जय भगवान महासंघ.समाजातील उपेक्षित व अन्याग्रस्त लोकांच्या मदतीला धावून जात त्यांचे मदतीचे साठी सदैव तत्पर असलेली संघटना म्हणून जय भगवान महासंघाची ओळख आहे.अश्या ह्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय बाळासाहेब सानप.
शाहू,फुले, आंबेडकर,राष्ट्रसंत भगवान बाबा आणि आम्हा सर्वांचे पंचप्रान लोकनेते गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या विचाराला बांधील असलेल्या ह्या संघटनेच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने आज दुसरबीड येथे ते आले असता त्यांनी समाजातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.अजूनही बऱ्याच अडचणी बाकी आहेत त्या आगामी काळात आम्हला संघटनेच्या माध्यमातून सोडवाव्या लागतील आणि त्या साठी जय भगवान महासंघ सदैव कटिबद्ध राहील असे उदगार संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी या प्रसंगी काढले.या वेळी संघटनात्मक बांधणी ही काळाची गरज आहे.नव्या जुन्याचा संगम साधत संघटनेचे काम मोठे करण्यासाठी, आज जय भगवान महासंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सर्व परिचित असलेले व्याख्यानकार प्रा.सिद्वेश्वर आंधळे तडेगाव यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच जय भगवान महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी स्मार्ट ग्राम सोयंदेव च्या सरपंच सौ जयश्री दीपक कायंदे व जय भगवान महासंघ कर्मचारी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंत मुंढे यांची निवड करण्यात आली यावेळी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी जय भगवान महासंघाचे विदर्भ अध्यक्ष शंकरराव उगलमुगले मराठवाडा अध्यक्ष सचिन डोईफोडे,गजानन ढाकणे,एकनाथ मिसाळ हे प्रामुख्याने उपस्थित होते.
