नागपूर:-दि.२४जूलै(सविता कुलकर्णी):- "कोरोना वायरस" कोविड-19 चा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने राज्य शासनाने " मिशन बिगिन अगेन" अंतर्गत काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागपूरातील "कोरोना वायरस" बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असून, त्या अनुशंगाने "कोरोना विषाणु" मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी दि.24.07.2020 खा.कृपाल तुमाणे, खा.विकास महात्मे आ.प्रकाश गजभिये, आ.विकास ठाकरे,कृष्णा खोपडे, अनिल सोले, महापौर संदिप जोशी, म.न.पा.आयुक्त तुकाराम मुंढे, सह.पो.आ.निलेश भरणे व सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ईतर लोकप्रतिनिधि यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये दि.25.07.2020 (शनिवार) व दिनांंक 26.07.2020 (रविवार) असे दोन दिवस नागपूर शहरात " जनता कर्फ्यू" लागू करण्यात येणार आहे.
"जनता कर्फ्यू" दरम्यान ज्य अत्यावश्यक सेवा उदा. मेडिकल एमरजेंसी, तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तुची दुकाने त्यामध्ये किराणा दुकान, डेअरी प्रोडक्ट्स, पेट्रोलपंप, हाँस्पिटलस् औद्योगिक क्षेत्रातील कारखाने हे सुरु राहतील. ईतर सर्व प्रकारचे आस्थापना बंद राहतील.
नागपूर शहर पोलिस व म.न.पा. कडून वारंवार आदेश देऊन सुद्धा लोकांनी कायद्याची पायमल्ली केल्याने "जनता कर्फ्यू" करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे.अन्यथा घरातच बसून रहावे. तसेच आपातकालीन परिस्थिति किंवा जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणारे वाहन वगळता इतर कोणीही अनावश्यक रस्त्यावर आपले वाहन घेऊन फिरणार नाही. अशा वाहन चालकांवर वाहतूक शाखे मार्फत चौकशी अंती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागपूर शहरातील सर्व सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले सर्व कर्मचारी, तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगावे.
नागपूर शहर पोलिस आयुक्तालया अंतर्गत सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील मुख्य चौकात नाकाबंदी लावण्यात आली असून महत्वाचे ठिकाणी फिक्स पाँईंट बंदोबस्त नेमण्यात आले आहे. नागपूर शहरात येणाऱ्या सर्व 8 नाक्यांवर नाकाबंदी लावण्यात आलेले आहे. सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिंकांमध्ये जनजागृती करण्याकरिता ध्वनीक्षेपकांद्वारे आवाहन देखिल करण्यात येत आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे व दंगा नियंत्रण पथकाचा वापर करून पायी पेट्रोलिंग देखिल नेमण्यात आलेली आहे. सदर बंदोबस्तात एकूण 364 अधिकारी,2300 पोलिस कर्मचारी,343 होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाचे 2 प्लाटून, दंगा नियंत्रण पथकाचे 5 पथक नेमण्यात आलेले आहेत. तसेच नियंत्रण कक्ष येथे आर.सी.पी./ क्यु.आर. टी. पथक हे देखिल राखीव ठेवण्यात आले आहे.
नागपूर शहर पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी दिलेल्या दिशा निर्देशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तोंडाला मास्कचा वापर 😷 करावा 🧑🏻👈,सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. व घरातच रहा. सुरक्षित रहा. असे आवाहन नागपूर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
