सोयगाव प्रतिनिधी ...विनोद कोते
सावळदबारा हे गाव सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगराळ भागात वसलेले गाव असुन तालुक्यातील शेवटचे गाव आहे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकांची शाखा आहे व या बँकेला १७ते१८ खेडी लागलेली असुन सर्व शेतकऱ्याचे व्यवहार याच बँकेवर अवलंबून आहे.परिसरातील गावामध्ये मुख्य व्यवसाय शेती हाच असुन शेतकऱ्यांना पैशाची गरज असुन शेतकरी अगोदरच आर्थीक संकटात सापलेला आहे.महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेत बर्याच शेतकर्याना पिककर्ज माफी झालेले असुनही बँकेचे मँनेजर प्रितम मावळे हे शेतकर्याना नाहक ञास देऊन कोणत्यान कोणत्या कारणाने कर्ज देण्यास मनाई करत असल्याची माहीती शेतकरी जगन्नाथ चव्हाण यांनी दिली .व नवीन शेतकर्याना आँक्टोबर मध्ये कर्ज देऊ तो पर्यत बँकेत येऊ नका असे बँक मँनेजर यांच्याकडुन सांगितले जात आहे.तरी अशा जाणुन बुजुन शेतकर्याना ञास देणाऱ्या अधिकार्यावर कार्यवाहि व्हावी असे परीसरातिल शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे
