हिवरखेड प्रतिनिधी@जितेश कारीया
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरातील तळेगाव बाजार येथे तिनशे एकरांवर सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकरी हतबल झाला होता. शेतकऱ्यांनी कृषी विभाग कडे तक्रार दाखल केल्यानंतर कृषी विभाग ने पंचनामें केले. मात्र अद्यापही मदत न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ह्यांनी तळेगाव बाजार येथे येवून शेतात जाऊन सोयाबीन चि पाहणी केली व शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी गोपाल अग्रवाल यांचे शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे, सरपंच राम खारोडे, कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे, विशाल राजे बोरे, श्याम राऊत, डॉ. निलेश वानखेडे, सोपान कुटाळे, मिलिंद जाधव हे उपस्थित होते. यावेळी शेतकरी मनोज राऊत, विठ्ठल निचळ, ऊध्दव मानखैर, गोपाल चिमणकार, सदानंद खारोडे, दादा पाटील, रामेश्वर लाखे, शे मुजफ्फर, वैभव खारोडे, प्रतिक पाटील, शुभम डिक्कर, केशव खारोडे, सचिन खारोडे, अमर उमाळे, सुमित पाटील, नकुल पाटील, संकेत पाटील, दिपक खारोडे हे होते. या वेळी आमदार अमोल मिटकरी यांचा शेतातच शाल श्रीफळ देऊन सत्कार सदानंद खारोडे राम खारोडे मनोज राऊत यांनी केला. कार्यक्रमाचे संचालन सागर पुंडकर यांनी तर आभार प्रदर्शन वैभव खारोडे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनाही तळेगाव बाजार ते बेलखेड रस्ता पाण्यामुळे वाहुन गेला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही त्यामुळे या रस्त्यावर गिट्टिकरण करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

