कक्ष सेविकांच्या मुजोर व कामचुकार पणा मुळे महिला 20 मिनिट रूग्णालयाच्या बाहेरच रक्तबंभाळ अवस्थेत पडून.
युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा स्त्री रुग्णालयात धडक
मुजोर कर्मचारी व अधिकाऱ्यांना युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी धरले धारेवर
शुक्रवार दि. २४ जुलै २०२० रोजि सायंकाळी 5:20 वाजताच्या दरम्यान सालोरा खुर्द, येथील महिला नंदा संदीप राठोड ह्या प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात येत असताना, अमरावती लगतच रुग्णवाहिकेत सदर महिला प्रसूत झाली. रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्यामुळे कसेबसे ते सामान्य स्त्री रुग्णालय अमरावती येथे पोहोचले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मदतीसाठी याचना केली. त्यांनी तिथल्या चौकीदार व कक्ष सेविकांना मदतीसाठी बोलावले. पण वीस मिनिटे होऊन सुद्धा त्या प्रसूत महिलेची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे सदर महिला रक्ताच्या थारोळ्यात वीस मिनिटे तेथेच तडफडत राहिली,महिलेचे नुकतेच जन्मलेले बाळ सुद्धा बाजूलाच पडले होते. बाळाचे नाळ कापले नसल्यामुळे खूप जास्त प्रमाणात रक्त वाहत होते. बाळाची प्रकृती सुद्धा बिघडत चालली होती. हे दृश्य बघून तेथील महिला चौकीदार मदतीसाठी पुढे सरसावली पण कुठलेही प्रिकॉशन नसल्यामुळे ती सुद्धा हतबल झाली. सध्या कोरोना महामारी मुळे सगळ्यांना खूप जास्त प्रमाणात प्रिकॉशन घेणे आवश्यक असते. या घटनेची माहिती युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्रचे तिवसा तालुका प्रमुख मा.अमोल भाऊ लायबर यांनी कॉल करून युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ गुडधे यांना दिली. क्षणाचाही विलंब न करता अवघ्या पाच मिनिटांमध्ये युवा लॉयन्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कक्ष सेविका लक्ष्मी जाधव ही बेजबाबदार, व सतत कुणाशीही हुज्जत घालणाऱ्या महिलेने, प्रसूत झालेल्या महिलेला हात लावण्या सुद्धा नकार दिला, ते बाळ मेलेल आहे असे सांगून पुन्हा रुग्णालयामध्ये निघून गेली. जेव्हा युवा लॉयन्स ग्रुप चे पदाधिकारी तिच्यावर संतापले डॉक्टरांना त्वरित हजर राहायला सांगितले. तेव्हा त्या प्रसूत महिलेवर उपचार सुरू झाला.जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एम. एस.वाठोडकर मॅडम.व आर. ए . मो. सोळंके साहेब. यांच्या समोर त्या कक्ष सेविकेला बोलावण्यात आले तरीदेखील ती महिला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गैरवर्तणूक करत मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा तिच्याच आवाजात तिला उत्तर देत तिला प्रथमता गप्प केले. लक्ष्मी जाधव या कक्ष सेविकेवर पहिले सुद्धा गुन्हे दाखल आहेत.ती वारंवार अशी गैरवर्तणूक करत असते व गोरगरिब रुग्णांना त्रास देत असल्यामुळे तिचे तात्काळ निलंबन व्हावे यासाठी एम. एस. वाठोडकर यांना निवेदन दिले जेणेकरून कुठल्याच रुग्णांना या नंतर गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागणार नाही.जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनचे कर्मचाऱ्यांवर कुठलाही दबाव नाही हे लक्षात येते.यावेळी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ गुडधे युवा लॉयन्स ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा प्रवक्ते मा. रोहित मोहोड अमरावती जिल्हा प्रमुख अमित भाऊ निकाळजे जिल्हा संघटक राहुल भाऊ पर्वतकार अमरावती जिल्हा विद्यार्थी संघटक आकाश गेडाम जिल्हा मुख्य संघटक मा.रोशन भाऊ पिटेकर तिवसा तालुका प्रमुख अमोल लायबर अमरावती शहर प्रसिद्धीप्रमुख शुभम राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

