नयन खरात @ मेहकर
काल दि १६ जुलै २० लॉक डाउन काळात अंगणवाडी केंद्र बंद ठेवावे कोरूना चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे माननीय आयुक्त आयसीडीएस यांनी ०१ जुलै 2020 दिलेल्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पालक आपल्या मुलांना अंगणवाडी केंद्रात वजन उंची घेण्यासाठी पाठवीत नाही. मुलांना अंगणवाडीत पाठवणे म्हणजे कोरोना संसर्गाला आमंत्रण देणे. काही अंगणवाड्या खाजगी इमारतीत असल्यामुळे घर मालक अंगणवाडी केंद्र उघडू देत नाही. त्यामुळे अंगणवाडी केंद्र बंद ठेवून नियमित कॅशवर माहिती भरून कामकाज करण्यात येईल. तसेच कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती पालकांच्या ग्रुप वर पाठवण्यात येईल. रेड झोन व कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना संदर्भात कुठलेही सर्वेक्षण करणार नाही. ग्रीन झोन मध्ये फक्त आय एल आय व सारी आजाराचे लक्षणे सर्वेक्षण अंगणवाडी क्षेत्रात करतील. स्पर्श न करता माहिती घेतील. परंतु कुठलीही तपासणी अंगणवाडी कर्मचारी यंत्रसामुग्री द्वारे करणार नाही. सर्वेक्षणा करिता 55 वर्ष वय असलेल्या बीपी शुगर किंवा दुर्धर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्ती करू नये. तसेच अंगणवाडी केंद्रात उपस्थित राहण्याची ची सक्ती करू नये. कोरूना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी दररोज 300 रुपये प्रतिदिन भत्ता दरमहा मानधना व्यतिरिक्त नगरपालिका व नगरपंचायत यांनी तर ग्रामीण व आदिवासी भागात ग्रामपंचायत कडून 14 वित्त आयोगाकडून किंवा जिल्हा कोरोना निधीतून देण्यात यावे. सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नावाने संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश देण्यात यावे. तसेच सर्वेक्षण फॉर्म व इतर साहित्य मास्क सँनी टायझर. हँन्डग्लोज देण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन कॉ अलका राऊत उप सरचिटणीस कॉ सुषमा घोडके तालुका अध्यक्ष अंगणवाडी सेविका सुखदाने सोमन मेहकर प्रकल्प अधिकारी माननीय सपकाळ साहेब यांना अंगणवाडी कामकाजाबाबत निवेदन दिले. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांची अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची ऑनलाईन मीटिंग दिनांक 11.7.2020 रोजी बैठक घेण्यात आली होती व बैठकीत वरिल मुद्द्यावर एक मत झाले होते.

