Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्टॅंडअप काॅमेडी सारख्या कार्यक्रमांवर बंदी आणावी:- निखिल भोसले

Responsive Ad Here

 स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जोशुआचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून अनेक शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.अग्रिमा सारखे आज बरेच जण सोशल मिडाया च्या माध्यमातून महापुरूषांच्या बदनामी कारक व्हिडीओ बनवुन पोस्ट करत असतात.अनेक अॅप्स च्या माध्यमातून चुकिच्या पद्धतीने व्हिडिओ बनवुन आज समाजामधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.अश्या निच औलादीचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा व अश्या अॅप्स वर बंदी आणावी अशी मागणी निवेदना द्वारे शिर्डी पोलिस स्टेशन येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे युवक  जिल्हा अध्यक्ष निखिल भोसले यांनी केली. यावेळी समिती च्या जिल्हा अध्यक्षा सौ.रमादेवी धिवर मॅडम,जिल्हाउपाध्यक्ष संतोष बोरूडे, राहाता तालुका अध्यक्ष शाम गाडेकर,शिर्डी शहर अध्यक्ष राहुल उर्फ आकाश जाधव,राहाता तालुका सरचिटणीस पवन शेजवळ आदी उपस्थित होते.