त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : उद्या दुपारी 12.15 वाजता अमरावती निवासस्थान येथून विचोरी, ता. मोर्शीसाठी प्रयाण, दुपारी 1 वाजता विचोरी येथे पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी, दुपारी 1.45 वाजता विचोरी येथून नया वाठोडा, ता. मोर्शीकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता नया वाठोडा येथे म. गां. ग्रा. रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात येणा-या काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2.45 वाजता नया वाठोडा येथून लेहगावकरिता प्रयाण, दुपारी 3 वाजता लेहगाव येथे तालुका काँग्रेस कमेटीची बैठक, दुपारी 3.30 वाजता मंगेश कोरडे यांच्या वडलांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 3.45 ते 4.30 वा. राखीव.
दुपारी 4.35 वा. लेहगाव येथून शासकीय विश्रामगृह, मोर्शीकडे प्रयाण, दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे उपविभागीय अधिकारी (राजस्व), तहसीलदार, मोर्शी, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग, उपविभागीय अभियंता, पं. स., मोर्शी, पोलीस ठाणेदार शिरखेड, बालविकास प्रकल्प अधिकारी, मोर्शी यांच्यासमवेत चर्चा, सायंकाळी 5.30 वाजता मोर्शी येथून अमरावती निवासस्थानाकडे प्रयाण, सायंकाळी 6.15 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

