प्रतिनिधी@नरेंद्र इंगळे बाळापूर ता.
बाळापूर- बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस मार्फत UGC व केंद्र सरकार ने मिळून विद्यार्थ्यांच्या कोरोना महामारी च्या संकटात परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय रद्द करन्यबाबत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविन्यात आले. आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशात भारताचा तीसरा क्रमांक लागतो व भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो अशा विदारक परिस्थिती मध्ये अंतिम वर्षाच्या 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे म्हणजे त्यांचा व त्यांच्या परिवाराचा जीव धोक्यात घालने आहे अशा चुकीचा निर्णायाचा निषेध बाळापूर विधानसभा युवक काँग्रेसने बाळापूर तहसील कार्यालय येथे UGC चे परिपत्रक जाळुन केला.सदर निषेध व निवेदन प्रदेश सचिव निनाद मानकर व जिल्हा महासचिव अभिलाष प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा अध्यक्ष साजिद इकबाल नेतृत्वात केल्या गेले.यावेळी प्रामुख्याने आदि काँग्रेस नेते भूषण गुजराती ,माजी नगर सेवक अक्रम भाई ,संदेश वानखडे (अध्यक्ष युवक काँग्रेस बाळापूर विधानसभा सोशल मीडिया),स्वप्नील पाठक(बाळापूर तालुका अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस) शाहरुख खान (जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया )शुभम तिडके(महासचीव बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस) महेश भाऊ उमाळे ,मो सौउद,आशिक भाईजान, मो. फैजान, अकिल अहेमद, नवेद इकबाल उपस्तीथ होते.

