पतिनीधी अकोला @पंकज शिरसाट
राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. दुधाला 30 रूपये भाव देण्यात यावा, प्रति लिटर 10 रूपयाचे अनुदान जाहीर करून थेट दुध उत्पादकांच्या खात्यात जमा करावे, दुध भुकटी करीता प्रति किलो 50 रूपये अनुदान द्यावे, शासनाने 30 रूपये प्रति लिटरप्रमाणे दुध खरेदी करावे, सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत वीमा काढण्यात यावा, मागणीप्रमाणे दुध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा तसेव लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना वाढीव वीज बिल देऊन नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवावी आदी मागण्यांसाठी भाजपच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा रणधीर सावरकर यांच्यात मार्गर्शना खाली अकोला जिल्ह्यात 37 ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून वीज दरवाढ व दुधाला भाव मिळण्यासाठी राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या सह दहा हजार कार्यकर्ते शेतकरी रस्त्यावर येऊन याना त्वरित न्याय मिळवून योग्य तो मोबदला देण्यात येणासाठी हे आंदोलन करण्यात आले
दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. कोरोना लाॅक डाउनमुळे मोठी घट झाली आहे. तर सरकी पेंड व सुग्रास खाद्य यांचे वाढलेले भाव, आणि दुधाचे घसरलेले भाव लक्षात घेता झालेला खर्च ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय आज अडचणीत सापडला आहे. बिसलरी पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दूध मात्र 17रू. या बेताल परिस्थितीमुळे दूध व्यवसाय मोडकळीस निघण्याची वेळ आली आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध २० ते २२ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केल्या जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी,सर्व दुधाळ जनावरांचा शासनामार्फत विमा काढण्यात यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या सह भाजप कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
