प्रा.सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी
अंदरसुल- आयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजना निमित्त अंदरसुल येथील श्रीराम मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन प्रसंगी श्री मकरंद सोनवणे सभापती,कृषी उत्पन्न उपबाजार समिती, अंदरसुल.श्री प्रकाश साबरे ,जेष्ठ पत्रकार लोकमत.श्री मारुती वाकचौरे ,शिवसैनिक श्री भागीनाथ थोरात जेष्ठ नेते, श्री दिलीप पुंड, श्री कारभारी वाकचौरे , श्री मारुती सोनवणे ,श्री राजू तात्या वाकचौरे ,श्री सुनील देशमुख, कार सेवक ऋषिकेश देशमुख आबा देशमुख तसेच सावता ग्रुप व दक्षिणमुखी हनुमान मंदिर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते . रक्तदान शिबिरास साईनाथ रक्तपिढी शिर्डी येथील डॉक्टर व त्यांची टीम उपस्थित होती . रक्तदान शिबिरास खूप चांगला प्रतिसाद लाभला व एकूण ५१ बॅग रक्ताचे संकलन झाले .रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते . या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी डॉ महेंद्र वाकचौरे ,श्री दत्ताभाऊ थोरात, सुरेश आण्णा शिरसाट,कांतीलाल भाऊ ठोके , संकेत खान्देशी सह सावता ग्रुप व दक्षिणमुखी हनुमान मंदिर मित्रमंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते . सर्वांच्या सहकार्याने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी झाला .

