Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गणेशोत्सव मंडळांना महत्वाचे आदेश जारी

Responsive Ad Here

लातूर जिल्हा प्रतिनिधी@रवि बिजलवाड.

 या वर्षी, सार्वजनिक गणेशोत्सवाची बाप्पाची मूर्ती ४ फुटांची !

' श्री ' च्या आगमन व विसर्जन मिरवणूका न काढण्याचे आव्हान...

गणेशोत्सव मंडळांना महत्वाचे आदेश जारी...

✓ मंडपामध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.

✓ आॅनलाई दर्शनासाठी व्यवस्था करावी.

✓ रक्तदान शिबीरांना प्राधान्य द्यावे.

✓ कोरोना व इतर आजारांबाबत जनजागृती करावी.

✓ मार्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे.

✓ शाडूची मूर्ती असल्यास विसर्जन घरीच करावे.

वडीलधाऱ्या पासुन लहानापर्यत सर्वांचं जिव्हाळ्याचा असलेल्या बाप्पाचा यंदा कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अंत्यत साध्या पद्धतीने सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून साजरा करावा.या वर्षी सार्वजनिक बाप्पाची मूर्ती ४ फुट व घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांची मर्यादित असावी,असा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत शचाललेला  प्रदुर्भाव व रुग्णसंख्या  विचारात घेता 22 ऑगस्टपासून साजरा करावयाच्या गणेशउत्सवा संदर्भात जिल्हाधिकारी जी. श्री.कांत यांनी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मनपा, स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल .मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळातकरिता ४ फूट व घरगुती गणपतीची मूर्ती २ फुर्टच्या मर्यादित असावी. शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमनेर आदी मूर्तीचे पूजन करावे. सांस्कृतिक उपक्रम उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे त्यांचे प्रतीबंधात्मक  उपाय तसेच स्वच्छता याबद्दल जनजागृती करावी. गणेश उत्सवाचे दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी .गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्कॅनिंग पर्याप्त व्यवस्था करावी. या विहित केलेल्या नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.  आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली नाही जाईल,असे आदेशात म्हटले आहे.