सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी 8 ऑगस्ट 2020
अंदरसुल प्रतिनिधी- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, अंदरसुल या शाळेच्या विद्यार्थिनींनी मिळविले दैदिप्यमान यश.
लासलगाव प्रेस क्लब व लासलगांव वांङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरिय ऑनलाइन काव्य लेखन स्पर्धेचे लासलगांव वांङ्मय मंडळाचे सदस्य लेखक डॉ. विलास कांगणेसर (३१ जुलै) व कवी कैलास भामरे सर (१ ऑगस्ट ) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावण सर / आला श्रावण या विषयावर राज्य भरा करिता खुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी श्री अरुण भांबारे व सौ भारती सोनवणे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत विद्यालयातील इ.८वी ची कु . प्रगती रविंद्र ढोले उत्कृष्ट - लहान गटामध्ये हिला काव्य लेखनाबद्दल प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले व इ.१० वी ची कु . पायल दत्तात्रय सोनवणे उत्तेजनार्थ - लहान गटामध्ये हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. त्याबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अॅड सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विनिता अमोल सोनवणे, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी आदिंकडून कौतुक करण्यात आले . तसेच त्यांना विद्यालयाचे शिक्षक दिपाली सोनवणे, कांचन गायकवाड, महेश मेहेत्रे, सचिन बोढरे, संतोष जाधव, राजेंद्र मालकर, तुकाराम गायकवाड, सागर गाडेकर, ज्योती बर्डे, मनीषा कदम, वंदना इंगळे, शिवप्रसाद शिरसाठ, अक्षय खैरनार, रामदास गायके आदिंचे मार्गदर्शन लाभले
या स्पर्धेचे बक्षीस प्रमाणपत्र वितरण दि.१२ ऑगस्ट रोजी ऑनलाईन वितरित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले.