Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

योगेश गुडदे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तसेच तडीपार आदेश त्वरित रद्द करण्यासाठी निवेदन

Responsive Ad Here

प्रतिनिधी हरीश हजारे अमरावती 

योगेश गुडदे यांच्यावरील तडीपार आदेश व दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्र भर उग्र आंदोलनाचा रोहित मोहोड यांनी दिला इशारा अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघ अमरावती चे सर्व पदाधिकारी यांच्या  वतीने सुद्धा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. अमरावती / येथे आज मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना अमरावती शहरातील विविध संघटना नी तसेच युवा लॉयस ग्रुप च्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले की  योगेश गुडदे हे एक समाज सेवक आहे सन 2015 मध्ये एका अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत करतांना काही राजकीय षंडयंत्रतुन त्यांच्या वर एक खोटा गुन्हा नोंदविण्यात आला होता जेव्हा त्यांनी पोलीस प्रशासनाला याचा जाब विचारला तेव्हा बडनेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी मान्य केले राजकीय दबावातुन खोटा गुन्हा नोंदविन्यात आला आहे त्यामुळे या प्रकरनात कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच सन 2020 मध्ये भातकुली रोड च्या आर आय पी एल या कंट्राकशन कंपनीचे ओहरलोड वाहतूकी मुळे 52 लोकांचे अपघात झाले त्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला तेव्हा प्रशासनाला तिथल्या परिसरातील नागरिकांनी कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा त्यांना कुठलाच न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी युवा लॉयस ग्रुप महाराष्ट्र कडे तक्रार दिली त्या तक्रार अर्जावर युवा लॉयस ग्रुप ने प्रशासनाला निवेदन देऊन आत्मदहन व रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात आर आय पी एल कंपनीला एक करोड अकरा लाख रुपये दंड सुद्धा झाला या दोन्ही प्रकरणात प्रशासनाने राजकीय दबावात येऊन  योगेश गुडदे यांच्यावर गुन्हा दाखल करून अमरावती पोलीस प्रशासनाकडून तडीपार आदेश काढण्यात आले आहे त्या करिता हे आदेश प्रशासनाने त्वरित रद्द करावे आणि गुन्हे मागे घ्यावे याकरिता अमरावती शहरातील संपूर्ण सेवाभावी संघटनेने उपस्थित राहून आपले निवेदन सादर केलेले आहे.. तसेच तडीपार आदेश व गुन्हे मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्र भर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोहित मोहोड मुख्य संघटक तथा प्रवक्ता युवा लॉयस ग्रुप महाराष्ट्र यांनी दिला आहे.तसेच अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघ अमरावती च्या वतीने सुद्धा योगेश गुडदे यांच्यावरील दाखल गुन्हे आणि तडीपार आदेश रद्द करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष हरीश हजारे, जिल्हा सचिव राजेश तुपोने, तालुका अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांच्या कडून निवेदन देण्यात आले आहे.