प्रतिनिधी @ गणेश तडसे
तालुक्यातील माहुलीचे वृक्षप्रेमी व पक्षीप्रेमी म्हणून ओळख असलेले सुमित राठोड महाराष्ट्र पोलीस नागपुर व निखील चव्हाण यांना नुकतेचं जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स कोल्हापुर ,महाराष्ट्रच्या वतीने पर्यावरण रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेमागील दोन तीन वर्षा पासुन विविध उपक्रमाच्या माध्यमातुन वृक्षाची लागवड व त्याचे संगोपन करत असल्याने कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार दिला आहे सुमित राठोड नागपुर राखीव पोलीस दलात आपवी खंडतर सेवा करुन ते आपलं छंद जोपासतात तर निखील चव्हाण हा एमपीएससी ची तयार करत असुन अभ्यासातुन वेळात वेळ काढुन तो आपलं छंद जोपासत आहे सुमित व निखील मागील दोन तिन वर्षापासुन शुभेच्याला एक वृक्षारोपण हा उपक्रम राबवत आहे यात मुलबाळाचं जन्म , वाढदिवस ,लग्न वाढदिवस, नोकरी निवड ,नोकरी पदोन्नती ,परीक्षा उत्तीर्ण ,राष्ट्रीय दीन विशेष, थोरपुरुषाची जयंती व पुण्यतीथी या सर्व प्रकारच्या माध्यमाला ते वृक्षारोपण करून तसेचं पक्षीसाठी पाणपोई अन्नाची सोय करुन शुभेच्या देतात.
