सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी 11 ऑगस्ट 2020
ममदापुर-रेंडाळे रोडवर काळवीट गंभीर जखमी अवस्थेत.काळवीटाला मानेच्या मागे मोठ्ठी जखम.कळविटाळा भरधाव गाडीची धडक कि प्राणघातक हल्ला!!"असा संभ्रम यावेळी स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.जखमी झालेल्या त्या कळविटाळा स्थानिकांच्या उपस्थितीत वनविभागामार्फत येवला येथे उपचारासाठी व पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हलविण्यात आले आहे.ममदापुर,राजापूर,रेंडाळे वनक्षेत्र परिसरात असल्या घटना नेहमी घडतातच यामागेही दोन-चार आठवड्यापूर्वी याच परीसरात मृत अवस्थेत काळवीट स्थानिकांना आढळून आल्याची ही घटनाही ओली आहे.त्यातच पुन्हा अल्पावधीतच जखमी अवस्थेत काळवीट आढळल्याची घटना घडलीय.अनेक वर्षांपासून अचानक पणे हरीण,काळवीट चरत असतांना किंवा एकत्रित कळपाने वावर करत असतांना उन्हाळ्याच्या दिवसात अन्न आणि पाण्यासाठी भटकंती करत असतांना वाडी-वस्तीवरील कुत्रे अचानकपणे हल्ले चढवतात आणि गंभीर दुखापत करतात. कधीकधी जिव वाचविण्याच्या नादात विहिरी-बारवात पडतात.कधी जखमी होऊन वाचतात..तर कधी प्राणच गमावला जातो.असल्या वारंवार घडणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य त्या ठोस उपाययोजना कराव्यात असे स्थानिकांचे मत आहे.

